Skip to main content

Posts

Featured

शिवकालीन हत्यारे संपूर्ण माहिती

शिवकालीन शस्त्रभांडार शिवकाळामध्ये शस्त्रांचे महत्व असामान्य होतं. शिवराय आणि संभाजी राजांनी दारुगोळा कोठारे आणि शस्त्र निर्मिती कारखाने उभारले होते.अफझलखाना विरुद्धच्या लढाईत झालेला चिलखत,बिचवा यांचा प्रभावी वापर असेल ,पावनखिंडीत बाजीप्रभू आणि रायाजी बांदल यांनी पट्टा वापरून केलेली शर्थ असेल किंवा शंभूकाळात चीक्कदेव याच्याविरुद्ध केलेला धनुष्य-बाणाचा वापर असेल.शस्त्रांची भूमिका प्रभावी राहिली आहे.अश्याच काही शस्त्रांची छोटीशी ओळख करून देण्याचा इथे प्रयत्न करत आहे उजव्या हातात पट्टा आणि डाव्या हातात मुल्हेरी मुठीची तलवार धरलेले शिवाजी महाराज तलवार प्रकार – कर्नाटकी धोप ,खंडा (मराठा ) ,राजस्थानी (राजपुती ), समशेर (मोगली ),गुर्ज ,पट्टा ,आरमार तलवार ,मानकरी तलवार तलवारी च्या मुठीवरूनच सुमारे तलवारीचे सुमारे ४० उपप्रकार होतात .मुठी तांबे ,पोलाद ,पितळ ,हस्तिदंत इत्यादींच्या असत . किरच,तेग ,सिरोही,गद्दारा ,कत्ती इ .उपप्रकार होत. खंडा ,मुल्हेरी,फटका हे मराठा तलवारींचे काही प्रकार . तलवारीचे नखा ,खजाना ,ठोला ,परज ,गांज्या,अग्र असे सुमारे २२ भाग दाखवता येतात . पाते पोलादी अ

Latest posts